Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगाव तालुक्याला दिलासा, अॅड. प्रमोद पाटील ' नोटरी पदी ' नियुक्त


चिंचणी, (कुलदिप औताडे)
          चिंचणी ता.कडेगाव येथील अॅड. प्रमोद पाटील (बापू) यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाली , त्याबाबतचे सर्टिफिकेट त्यांना नुकतेच मिळाले आहे. अॅड.प्रमोद पाटील यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्यामुळे सोनहिरा खोऱ्यासह कडेगाव तालुक्यातील लोकांना याचा फायदा होणार आहे.
          आजपर्यंत सोनहिरा खोऱ्यातील लोकांना नोटरी करणेसाठी कराड, विटा, पलूस या ठिकाणी जावे लागत असे, आता कडेगाव तालुक्यातच भारत सरकारने नोटरींची नियुक्ती केल्यामुळे लोकांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. तालुक्यातील लोकांची नोटरीची सोय झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. अॅड.प्रमोद पाटील यांच्या नियुक्तीमुळे विविध स्तरातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments