Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात आज ८ पॉझिटिव्हइस्लामपूर, ( सूर्यकांत शिंदे  ) 
    : वाळवा तालुक्यात आज ८ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या आठ व्यक्तींमधील एकाचा काल रात्री उशिरा मृत्यू झाला असून तालुक्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६ वर पोहचली आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.
    तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत निघाली असून प्रशासनाची चिंताही वाढली आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या १५१ वर पोहोचली आहे. येथील बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात रुग्णांची व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
   इस्लामपूर राजे बागेश्वर नगर येथील ६५ वर्षीय  खड्डे खोदकाम करणारा पुरुष पॉझिटिव आला आहे .इस्लामपूर येथील ४० वर्षाचा पुरुष पॉझिटिव आला आहे. कोल्हापूर रोडवरील एका प्रायव्हेट इलेक्ट्रिकल दुकानात तो काम करत होता.इस्लामपूर येथील २ व्यक्ती कृष्णा हॉस्पिटल कराड  येतील अहवालात पॉझिटिव आलेले आहेत. ते कोकरूड येथे रोज जात होते.इस्लामपूर येथे ३७ वर्षाचा पुरुष पॉझिटिव आला आहे. सदर व्यक्ती काल रात्री उशिरा मरण पावला आहे. कन्स्ट्रक्शनवर मजुरी करत होता. ऐतवडे खुर्द ५८ वर्षाचा पुरुष पॉझिटिव आला आहे. तो वारणा फॅक्टरी मधून रोज ये-जा करत होता. आष्टा येथील ३५ व ४० वर्षीय दोन महिला पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. २९ जुलै ला  पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरातील या महिला आहेत.

Post a Comment

0 Comments