Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्याला कोरोनाचा दुसरा मोठा धक्का

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
        वाळवा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून वाळवा तालुक्यात आज ६९ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
यामध्ये इस्लामपूर शहरातील २३ जणांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी दिली.
         तालुक्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात पाॅझिटीव्ह आल्याने हा मोठ्या संख्येत रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुक्याला दुसरा मोठा धक्का बसला आहे. आज तालुक्यातील एकूण ६९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये ३७ पुरुष व ३२ महिलांचा समावेश आहे. नागरिकांच्यात चिंता वाढू लागली आहे. वाळवा तालुक्यातील छोट्या छोट्या वाडी वस्तीवर मोठ्या संख्येने कोरोना आपले अस्तित्व दाखवू लागल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
         वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. नागरिकांनी अतिशय दक्षता घेण्याची गरज आहे. आज तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण सापडलेत त्यांची संख्या पुढील प्रमाणे: इस्लामपूर २३, कासेगाव १५, पेठ, येडेनिपाणी , बोरगाव प्रत्येकी १ , आष्टा ९ , दुधारी २, कामेरी १, वाटेगाव ६, ऐतवडे खु.२, बावची ८, अशी रुग्णांची संख्या असून यातील काही रुग्ण इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथे व मिरज येथे काही रुग्ण उपचार घेत आहेत.

Post a Comment

0 Comments