Daily Mahasatta

Daily Mahasatta

गार्डीत एकाच कुटुंबातील १० पाॅझीटीव्ह, विट्यातील एक डाॅकटर पाॅझीटीव्ह

 


विटा, प्रतिनिधी

       गार्डी ता. खानापूर येथील एका माजी उपसरपंचासह कुटुंबातील दहा जणांचे कोरोना  चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  तसेच विटा शहरातील आणखी एका बालरोग तज्ञांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज दुपार पर्यंत  तालुक्यात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहेत.
         गार्डी ता. खानापूर येथील एका मेडिकल  व्यवसायिकाची कोरोना चाचणी दोन दिवसापूर्वी  पाॅझीटीव्ह आली होती. त्यांच्या कुटुंबातील आणि संबंधित अशा आणखी दहाजणांचे स्वॅब घेण्यात आले होते. आज त्या दहाजणांचा चाचणी अहवाल आला असून माजी उपसरपंचासह चार व्यक्ती आणि सहा लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच विटा ग्रामीण रुग्णालयात सेवेत असलेल्या एका बालरोगतज्ञांचा कोरोना अहवाल  पाॅझीटीव्ह आला आहे. त्यामुळे आज दुपार पर्यंत एकूण ११ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

Post a Comment

0 Comments