Daily Mahasatta

Daily Mahasatta

गौरी सजावटीच्या माध्यमातून कोव्हीड योद्धांना अनोखी सलामी, परिसरातून कौतुक


नेर्ले : येथील सौ. कांचन पाटील यांनी गौरी सजावटीच्या माध्यमातून रुग्ण सेवेसाठी झटणार्या डाॅक्टर आणि पोलिसांना अनोखी सलामी दिली आहे.

पेठ ( रियाज मुल्ला)
         यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाने थैमान घातले. त्यामुळे बऱीच सुज्ञ मंडळी गणेशोत्सव  साध्या पद्धतीने साजरा करत आहेत. मात्र या साधेपणात देखील सामाजिक बांधिलकी जोपासत नेर्ले येथील एका गृहिणीने कोरोना विरोधात लढणार्या डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांना गौरी-गणपतीच्या सजावटीच्या माध्यमातून अनोखी सलामी दिली आहे.
         गौरी गणपतीचा सण अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरा करतात. नेर्ले ता.वाळवा येथील सौ. कांचन पाटील यांनी देखील कोरोना या संसर्गजन्य रोगापासून कसे दूर राहायचे, कोरोना होऊ नये त्यासाठी घ्यावयाची काळजी या संदर्भात केलेले प्रबोधन , कोरोना ला हरवण्यासाठी धडपडणारे डॉक्टर्स, नर्सेस ,पोलीस यांचे देखावे गौरी गणपतीच्या माध्यमातून दाखवण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न केला आहे. हे देखावे उभे करण्यासाठी सौ. कांचन पाटील यांना एक महिना कष्ट घ्यावे लागले असून यासाठी त्यांचे पती संदेश पाटील, सासू , सासरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments