Daily Mahasatta

Daily Mahasatta

उधार दिलं नाही, इस्लामपूरात दुकानदारावर खूनी हल्लाइस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे  )
    मोटर सायकलचा टायर उधार दिला नाही याचा राग धरून एकाने  दुकानदारावर खुनी हल्ला केला . यामध्ये दुकानदार रवींद्र महादेव पाटील ( वय-४६) रा. बोरगाव ता.वाळवा हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी रणजित नानासो सूर्यवंशी ( वय-३२) रा. बोरगाव याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की रवींद्र पाटील यांचे बोरगाव येथे अभिजित स्पेअर पार्ट या नावाचे दुकान आहे. रणजित सूर्यवंशी हा या दुकानात आला व मोटर सायकलचा टायर उधार मागितला. रवींद्र यांनी टायर उधार देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने रणजित याने दुकानासमोरच पडलेला लोखंडी रॉड घेतला व रवींद्र यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात घातला. यामध्ये रवींद्र हे त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड जोराचा मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. याची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाली असून रणजित सूर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना आज मंगळवार ता.४  रोजी सकाळी घडली. अधिक तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments