Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडकरांच्या मागणीला मोठे यश


कुपवाड : येथील गॅस शवदाहिणीचे महापौर गीताताई सुतार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. प्रभाग सभापती मदिना बारुदवाले, नगरसेवक विजय घाडगे, प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर उपस्थित होते. 

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
        कुपवाड शहरात गॅसदाहिनी व्हावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या मागणीला अखेर यश आले आहे. आज कुपवाडच्या गॅस शवदाहिणीचे लोकार्पण महापौर गीताताई सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष लक्ष देत हे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
           तत्कालीन सभापती संतोष पाटील यांच्या कारकिर्दीत कुपवाडच्या गॅस शव दाहिणीला मंजुरी देण्यात आली होती. याबाबत कुपवाडचे नगरसेवक गजानन मगदूम, शेडजी मोहिते, विजय घाडगे यानी सातत्याने पाठपुरावा केला होता. कुपवाड करांसाठी गॅस दाहिणीचा गरज ओळखून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी संबधित ठेकेदाराला सदर दाहिणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुपवाड गॅस शवदाहिणीचे काम पूर्ण झाले आहे.
           आज कुपवाड गॅसशवदाहिणीचे लोकार्पण महापौर सौ गीताताई सुतार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर आणि प्रभाग सभापती मदिना बारुदवाले, स्थानिक नगरसेवक विजय घाडगे, नगरसेवक प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, शहर अभियंता आप्पा अलकुडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सतीश सावंत, सामाजिक कार्यकर्ते हणमंत सरगर, मनपा स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे, विकास कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments