Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात आज २१ पाॅझीटीव्ह


इस्लामपूर.( सुर्यकांत शिंदे  )

     वाळवा तालुक्यात आज आणखी २१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाळवा तालुक्यातील रुग्णांची संख्या आता ४०६ वर पोहचली आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.
     तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत निघाली असून प्रशासनाची चिंताही वाढली आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या ४०६ वर पोहोचल्याने तालुक्याबरोबरच इस्लामपूर शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजही इस्लामपूर मधील ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये ४६,४२,४४,७,५१ वर्षीय पुरुष, ५८,३०,३७,१३ महिलांचा समावेश आहे. तर तालुक्यातील कापुसखेड २२ वर्षीय पुरुष, कमेरीमधील ३२ वर्षीय पुरुष,५२ वर्षीय महिला, कासेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष,साटपेवाडी येथील २० पुरुष, बोरगाव येथील १९, ३५ वर्षीय पुरुष, ताकारी येथील३६५ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, बागणी येथील २८, २४ वर्षीय पुरुष तर वाळवा येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

चौकट  :-
    नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याचा व पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाच्या एका आधीकाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील तहसील कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, शिवाय त्याच दिवशी शहरातील एक नामांकित डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक नगरसेवक यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.

 

Post a Comment

0 Comments