Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

यूपीएससी परीक्षेत इस्लामपूरच्या निमिष पाटीलचे सुयशनिमिष पाटील यांना पेढा भरवुन  यशाचा आनंद साजरा करताना पाटील 
कुटुंबातील सदस्यांच्या चेहर्यावरील सुहास्य छायाचित्र दिसत आहे.

इस्लामपूर( हैबत पाटील) 
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील निमिष  दशरथ पाटील याने देशात 389 क्रमांक पटकावला आहे . त्याच्या या यशाने इस्लामपूर च्या वैभवात आणखी एक मानाचा  तुरा खोवला गेला  आहे.
    निमिष हा येथील कुसुमताई पाटील कन्या महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या दशरथ पाटील यांचा मुलगा आहे . त्याचे प्राथमिक शिक्षण येथील व्ही एस नर्लेकर विद्यालयात झाले .तर पदवी शिक्षण सरदार पटेल महाविद्यालय मुंबई येथे झाले असून त्याने मेकॅनिकल मधून पदवी मिळवली होती.नंतर यूपीएससी अभ्यास क्रमासाठी त्याने दिल्ली गाठली व तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे घवघवीत यश संपादन केले आहे . त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे . त्याच्या निकटवर्ती यांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला .Post a Comment

0 Comments