: तातडीने उपाययोजना करण्याची हणमंतराव देशमुख यांची मागणी
आटपाडी (डॉ.रामदास नाईकनवरे)
दिघंची गावात कोरोना आणि साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटंले आहे की, सध्या आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. त्यामध्ये दिघंचीसारख्या गावात रोज २५ पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर सध्या दिघंची गावात तापाची व विषाणूजन्य प्रादुर्भावाची साथ चालू असल्याने तातडीने प्रत्येक घरोघरी तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा ही तापाची साथ वाढून तालुक्यामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी आटपाडी तालुक्यातील सर्व आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल अशा पद्धतीने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हणमंतराव देशमुख यांनी केली आहे.
0 Comments