Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात प्रकाश हाॅस्पिटल मधुन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाचे अनोखे स्वागत


: रूग्ण व कुटुंबाने डाॅक्टर व स्टाफ चे मानले आभार

इस्लामपूर (प्रतिनिधी)
          कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाळवा, शिराळा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना आधार वाटावा म्हणुन उरुण - इस्लामपुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी कोविड हाॅस्पिटल सुरु केले. या हाॅस्पिटल मध्ये पहील्याच दिवशी उपचारासाठी दाखल झालेला रुग्ण बरा होऊन घरी परतला. रुग्ण व नातेवाईकांच्या चेहर्‍यावरील भितीचे सावट पुर्ण मावळुन आनंद व समाधान दिसत होते.
           दि.७ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील ५८ वर्षीय पुरूषाचा कोविड पाॅझिटीव्ह रिपोर्ट आल्याने शिराळा उपजिल्हा रुग्णालयातुन पुढील उपचारासाठी उरूण-इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे दाखल करण्यात आले होते.सदरचा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले होते.उपचार सुरु झाल्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होऊ लागली होती आज शनिवारी दि.१५ ऑगस्ट रोजी प्रकृती पुर्ण बरी झाल्याने डिस्चार्ज करण्यात आला.
           यावेळी प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये कोरोनाग्रस्त दाखल झालेला हा पहीला रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने रुग्णावर फुलांचा व गुलाब पाखळ्याचा वर्षाव करत रुग्णाला हाॅस्पिटल मधील तज्ञ डाॅक्टर,नर्स व इतर स्टाफने निरोप दिला.यावेळी माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांच्याहस्ते वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन सदर रुग्णांचा सत्कार करण्यात आला.
          यावेळी रूग्णांने व रुग्णाच्या नातेवाईकांनी यशस्वी उपचाराबाबत व हाॅस्पिटल मधील सोयीसुविधेबाबत उरुण - इस्लामपुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व प्रकाश हाॅस्पिटलचे संस्थापक निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांचे व सर्व तज्ञ डाॅक्टर्स,नर्स स्टाफ व व्यस्थापनाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments