Daily Mahasatta

Daily Mahasatta

जयश्रीताई पाटील यांचे दातृत्व; कोव्हीड सेंटरला ८ लाखांची उपकरणे भेट

 

सांगली (राजेंद्र काळे)

     काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली महापालिकेच्या क्षेत्रातील  विविध संस्थांकडून ८ लाखांची वैद्यकीय उपकरणे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. स्वतः कोरोनामुळे बाधित असताना देखील जयश्रीताई पाटील यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी  मोठ्या धीराने या संकटाला सामोरे जात नागरिकांसाठी मदतीचा हात खुला ठेवला आहे.

        सांगली महापालिकेकडून उभारण्यात येत असणार्या १०० बेडच्या कोव्हिड हॉस्पिटलला दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले होते. या हॉस्पिटल साठी मदतीचा ओघ वाढत चालला आहे. आज कॉंग्रेस नेत्या जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्थांकडून मनपाच्या कोव्हिड हॉस्पिटलला आठ लाखाची वैद्यकीय उपकरणे दिली. ही सर्व उपकरणे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वीकारत मदत करणाऱ्या संस्थांचे आभार मानले आहेत.

     यामध्ये विष्णु अण्णा खरेदी विक्री संघ, उत्तर शिवाजीनगर शिक्षण संस्था वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय यांच्या वतीने ६ लाखाचे वैद्यकीय उपकरणे तसेच समस्त मेमन समाज सांगली यांच्याकडून दीड लाखाची वैद्यकीय उपकरणे व शफी बागवान यांच्या गोल्ड चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांचेकडून १ लाखाची अशी एकूण आठ ते दहा लाखाची उपकरणे काँग्रेस नगरसेवकांच्या उपस्थितीत आज कोव्हिडं हॉस्पिटलला प्रदान करण्यात आली. यामध्ये निर्जंतुकीकरण होरिझटल ऑटोक्लेव्ह,  ऑक्सिजन सिलेंडर फुल किट, मल्टी पॅरामॉनिटर, ईसीजी मशीन , व्हील चेअर , सेमी फॉलर बेड, आयव्ही स्टँड , बेड साईड लॉकर या उपकरणाचा समावेश आहे.

      यावेळी विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, मनपाचे विरोधीपक्षनेते उत्तम साखळकर, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण, प्रकाश मुळके, अभिजित भोसले, मनोज सरगर, मनपाचे शहर अभियंता आप्पा अलकुडे, वैभव वाघमारे , प्रमुख औषध निर्माता दत्तात्रय अष्टेकर, विष्णू अण्णा संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, मदनभाऊ पाटील युवा मंचाचे प्रशांत पाटील, अमर निंबाळकर, आनंदा लेंगरे, शीतल लोंढे आदी उपस्थित होते. या मदतीबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्वच संस्थांचे आभार मानले आहेत.


सांगली : विविध संस्थांकडून आठ लाखाची वैद्यकीय उपकरणे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, मनपाचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण,  प्रकाश मुळके, अभिजित भोसले, मनोज सरगर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments