Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात आज १३ कोरोना पाॅझिटीव्ह


इस्लामपूर ( सूर्यकांतशिंदे )
           वाळवा तालुक्यात आज आणखी १३ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाळवा तालुक्यातील रुग्णांची संख्या आता १८६ वर पोहचली आहे. त्यापैकी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७२ एव्हढी आहे. तालुक्यात आत्तापर्यंत १० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.
यामध्ये मसूचीवाडी येथील ५० व ४५ वर्षाचे दोन व्यक्तीचा समावेश आहे. येडेमछिंद्र येथील २४ वर्षाचा १ व्यक्ती, कासेगाव येथील ४०,१८,१४, असे ३ व्यक्ती,गोटखिंडी येथील ५५ वर्षीय १ व्यक्ती,इस्लामपूर येथील ६१ वर्षीय १ व्यक्ती,आष्टा येथील ३४,५२,४४,५2 वर्षाचे ४ व्यक्ती, बावची येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती असे एकूण १३ अहवाल पोझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या कुटुंबियांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments