कृष्णा कारखान्याचे शेअर्स परत करण्यासाठी दमदाटी, कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल: चिंचणी वांगी पोलिसात तक्रार दाखल

कडेगाव,  ( सचिन मोहिते )
        कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे  शेअर्स परत करण्यासाठी धमकी व शिवीगाळ करत असल्याची  तक्रार  अमोल पाटील (वय ३५ वर्ष रा. मोहिते वडगांव) या  कर्मचार्याच्या विरोधात  चिंचणी वांगी पोलिसात दाखल झाली आहे.
           याबाबत अधिक माहिती अशी की कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र कडेगांव तालुक्यात आहे. मात्र गेल्या पाच वर्षापासून येथील सभासदावर विविध कारणाने अन्याय केला जात असल्याची सभासदांची तक्रार आहे. आता तर कर्मचारी अमोल पाटील यांनी  फिर्यादी दत्तात्रय जाधव यांच्या आसद ता. कडेगांव येथील  घरी जाऊन तू कारखाना शेअर्स परत कर तुला लगेच पैसै देतो, असे म्हणत असताना फिर्यादी ने शेअर्स परत घेण्यास नकार दिला म्हणून  कर्मचारी अमोल पाटील यांनी  दमदाटी व शिवीगाळ केल्याची फिर्याद  चिंचणी वांगी पोलिस स्टेशनला दत्तात्रय जाधव रा. आसद यांनी दिली आहे. या  प्रकरणी काय  कारवाई
होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे .

 

Post a comment

0 Comments