भिलवडीत कोव्हिडं योद्धालाच कोरोनाची लागण


पलूस ( मोसीन वांगकर)
      वाळवा येथील पेठभागामध्ये राहणाऱ्या व भिलवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका  ३० वर्षीय पोलिसालाच कोरोनाची लागण झाल्याने वाळवा परिसरासह भिलवडी मध्ये खळबळ उडाली आहे .काही दिवसापूर्वी सदर पोलीस कर्मचारी सातारा येथे कामानिमित्त गेला होता,त्याच ठिकाणी कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे.        
       सदर रुग्णाला  ताप, कणकण, खोकला अशी लक्षणे असल्यामुळे वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.एस.नायकवडी यांनी त्यांना इस्लामपूर कोव्हिड सेंटरला तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट दि.५ जुलै रोजी कोरोना बाधीत आल्याने, त्यांच्या कुटुंबातील  पत्नी, वृद्ध आईवडिल यांना घरातच कॉरन्टाईन करण्यात आले आहे. तर घराचा परिसर ग्रामपंचायतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील केला आहे.
      दरम्यान भिलवडी ग्रामपंचायतीच्यावतीने ही भिलवडी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये औषध फवारणी करण्यात आली असून, पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.त्याच बरोबर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील पोलीस कर्मचारी  व इतर लोकांचा शोध घेवून त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.भिलवडी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये औषध फवारणी करणे वेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, सरपंच विजयकुमार चोपडे, ग्रामविकास अधिकारी आर.डी.पाटील, तलाठी गौस महंम्मद लांडगे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Post a comment

0 Comments