
काल बुधवार ता. ५ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे आकस्मिक निधन झाले. एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी म्हणून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनामुळे कडेगाव, कवठेमंहकाळ तालुक्यासह जिल्हाभरातून दुःख व्यक्त होत आहे. तहसीलदार शितल यादव हे सेवानिवृत्त शिक्षक खाशाबा यादव यांचे पूत्र तर घानवड ता खानापूर येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अर्जुन यादव , नामदेव यादव , रामचंद्र यादव, आनंदा यादव यांचे ते पुतणे होत.
0 Comments