Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा, गार्डीसह तालुक्यात ७ कोरोना पाॅझीटीव्ह


 सांगली (राजेंद्र काळे) 
 विटा शहरातील तीन रुग्णांसह मंगरूळ, गार्डी, वेजेगाव अशा अन्य गावातून आज सकाळी 7 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 
काल मंगळवारी विटा शहरासह तालुक्यात सहा रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते .त्यानंतर आज पुन्हा एकदा बुधवारी सकाळी विटा शहरातील तिघा जणांचे कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 37 वर्षाची स्त्री, 70 वर्षाचा पुरुष व 20 वर्षाचा पुरुष या फुलेनगर मधील नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण नगरपालिकेतील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात होते. तसेच मंगरूळ येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले 15 वर्षाचा मुलगा आणि 25 वर्षाचा पुरुष या दोघांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर गार्डी येथील 38 वर्षीय आणि वेजेगाव येथील एका 35 वर्ष  पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .त्यामुळे आज बुधवारी सकाळीच विटा शहरासह तालुक्यातील सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments