Daily Mahasatta

Daily Mahasatta

वांगीत काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण


उपसरपंच पदासाठी रस्सीखेच, इच्छुक सदस्यांना फोडण्यात मग्न

वांगी ( सचिन मोहिते )
         वांगी (ता.कडेगाव) येथे उपसरपंच निवडीसाठी काँग्रेस अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. उपसरपंच पदासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याने पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
         तीन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आली आहे. थेट सरपंच निवडीत डॉ.विजय होनमाने विजयी झाले होते. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता येवून ही पहिल्या उपसरपंच निवडीपासून सदस्यामध्ये गटबाजी निर्माण झाली आहे. ती गटबाजी अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. सुरूवातीला राहुल साळुंखे नंतर बाबासाहेब सूर्यवंशी आणि यशवंत कांबळे यांना उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली. आता यशवंत कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवीन उपसरपंच निवड होणार आहे.
           सध्या उपसरपंच पदासाठी संजय कदम, धनाजी सूर्यवंशी, सौ.मनीषा पाटील, सौ.विद्या पाटणकर यांची नावे चर्चेत आहेत. उपसरपंच निवडीवरून काँग्रेस अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. एकाच पॅनेल मध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या प्रत्येक गटाच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. प्रत्येक इच्छुक गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यामुळे सदस्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. आपल्या गटाची गोळाबेरीज करण्यासाठी इच्छुकड्डन सदस्यांना आर्थिक बाबीसह इतरआमिषे दाखवली जात असल्याची चांगलीच चर्चा रंगु लागल्या आहेत. सदस्यांची फोडाफोडी करण्यासाठी प्रत्येकाकडुन चढाओढ लागली आहे.त्यामुळे उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


Post a Comment

0 Comments