Daily Mahasatta

Daily Mahasatta

निती आयोगाच्या ' या ' शिफारसीमुळे ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होणार


: माजी खासदार राजू शेट्टी यांची निती आयोगावर खरमरीत टीका

पलूस (मोसीन वांगकर)
         शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकूण ऊस पिकापैकी ८५ टक्के ऊस कारखान्यांनी स्वीकारावा व अन्य १५ टक्के ऊस स्वीकारू नये. तसेच ऊसशेती न करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार रुपये अनुदान द्यावे, या निती  आयोगाने केलेल्या शिफारसी भंपक आणि मूर्खपणाच्या आहेत, अशी खरमरीत टीका स्वाभिमानी  शेतकरी  संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निती आयोगावर  केली आहे
         राजू शेट्टी म्हणाले, उसाचे क्षेत्र कमी करण्यासाठी निती आयोगाने शासनाला काही शिफारसी केल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकूण पिकांपैकी केवळ 85 टक्के उसाची खरेदी कारखान्यांनी करावी अन्य 15 टक्के कारखान्यांनी विकत घेऊ नये तसेच जे शेतकरी ऊस शेती करणार नाही त्यांना प्रोत्साहन अनुदान सहा हजार रुपये द्यावे अशा शिफारसी निती आयोगाने शासनाकडे केल्या आहेत.तसेच निति आयोगाच्या इतर नियम , सुचना व उपाययोजना ह्या निव्वळ मूर्ख व भंपकपणाच्या आहेत .
        स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा याच्या अरुणोदय या कृषी सेवा केंद्राचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते . ते म्हणाले की ऊस हे शाश्वत पीक आहे त्यासाठीच शेतकरी उसाची जास्त प्रमाणात शेती करतो. ऊसाचे पिक कमी करायचे असेल तर इतर पिकांनाही शाश्वत दर दिला पाहिजे. आपला देश खाद्यतेल , डाळी आयात करतो जर का खाद्यतेलाच्या बियांचा व डाळवर्गीय  पिकांना हमि भाव वाढवून त्यांना चांगला दर मिळावा म्हणुन शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. जर या  पिकांना हमीभाव वाढवून दिला तर आपला देश खाद्यतेल व डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल .
          नीती आयोगाच्या विद्वानांनी केंद्र सरकारला ज्या शिफारशी केल्या आहेत, त्या शिफारशी आग रामेश्वरे आणि बंब सोमेश्वरे अशा प्रकारच्या आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे .अतिरिक्त साखरेचा व  अतिरिक्त ऊस शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील ऊसा खालील तीन लाख हेक्टर शेती अन्य पिकाकडे वळवावी अशी शिफारस आयोगाने केंद्र सरकारला केली आहे.या साठी प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार रुपयांचे अनुदान तीन वर्ष साठी  द्यावे असे सुचवण्यात आले आहे या शिफारशीवर राजू शेट्टी यांनी आक्षेप घेतला आहे.


 

Post a Comment

0 Comments