Daily Mahasatta

Daily Mahasatta

गलाई बांधवांचा ' आनंद ' हरपला


विटा, प्रतिनिधी
           पैसे खूप लोक कमवतात.. आमचा सांगली जिल्हा, त्यातील खानापूर, आटपाडी तालुके गलाई व्यवसाय, व त्यातून निर्माण झालेल्या श्रीमंत , ऐश्वर्य संपन्न लोकांसाठी प्रसिद्ध आहेत. गजांत लक्ष्मी प्रसन्न असावी असेही शेकडो लोक आहेत. पण गरजू लोकांना निस्वार्थ पणे मदत करणाऱ्या लोकांची वानवा सर्वत्र जाणवते. पैशाने आणि मनानेही श्रीमंत असणारे अनेक दुकानदार खानापूर तालुक्यात आहेत.. त्यातील अग्रणी दानशूर व्यक्तिमत्व आंनदराव उर्फ पिंटूशेठ यशवंतराव देवकर यांच्या अकाली जाण्याने समस्त दातृत्वान गलाई बांधवांचा "आनंद" हरपला आहे।
        काही योगायोग दुर्दैवी असतात, पिंटूशेठ यांचे वडील यशवंत शेठ या नावाने प्रसिद्ध होते, त्यांचेही कमी वयात निधन झाल्याने वयाने लहान असलेल्या आनंदराव यांच्यावर कुटुंब व व्यवसाय याची जबाबदारी आली. मोठया हुशारीने व कष्टाने प्रतिकूल परिस्थितीतही दादर, भांडुप मुंबई येथे मर्यादित असणारा व्यवसाय त्यांनी विटा, सोलापूर , औरंगाबाद पर्यंत वाढवला.खरसुंडी च्या सिद्धनाथ चे भक्त असलेल्या पिंटूशेठ यांच्या प्रत्येक व्यवसाय व शाखेचे नाव "श्रीनाथ" आहे. श्रीनाथ ज्वेलर्स, श्रीनाथ फायनान्स निधी लिमिटेड , श्रीनाथ हार्डवेअर वाटूंब्रे,असे अनेक ठिकाणी त्यांचे व्यवसाय होते. त्यातुन त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला.
         पिंटूशेठ त्यांच्या दानशूर स्वभावासाठी प्रसिद्ध होते. कधी कुणी त्यांच्याकडे मदत मागण्यांसाठी गेलेला गरजू माणूस रिकाम्या हाताने परतला नाही. देवालाही मोह पडावा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. अध्यात्मात रमणारे पिंटूशेठ राजकारणात ही सक्रिय असत. पण तिथेही त्यांनी कधीही कुणाशीही कटुता येऊ दिली नाही.
गावातील लहान थोर लोकांना नावानिशी ओळखणारा , भेटल्यावर प्रत्येकाला ख्याली खुशाली विचारणारा , वेजेगावच्या विकासासाठी इर्षेने कामं करणारा हा दानवीर देवाघरी गेल्याने वेजेगाव ची अपरिमित हानी झाली आहे. विंदा करंदीकरांची "देणाऱ्याने देत जावे" ही कविता पिंटूशेठ अक्षरशः जगले..! तालुक्यातील विराज केन्स सारख्या संस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. श्रीनाथ मंगल कार्यालय नागेवाडी च्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्य लोकांना स्वस्तात कार्यालय उपलब्ध करून दिलेच पण दर वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून गरिबांची लग्ने लावून दिली.मागच्या वर्षी आलेल्या महापुरात पुरग्रस्थांना मदत करण्यासाठी पिंटूशेठ सदैव तत्पर राहिले.
         पिंटूशेठच्या निधनामुळे हजारो लोक आपण 'अनाथ ' झाल्याची भावना व्यक्त करत आहेत, यामध्येच त्यांच्या उतुंग दातृत्वाची, कर्तृत्वाची छबी पाहयला मिळते.त्यांच्या मातोश्री स्वर्गीय लिलानानी वेजेगावच्या सरपंच होत्या त्यावेळी गावाचा पाणीप्रश्न निकालात निघावा म्हणून त्यांनी स्वखर्चाने विहीर खोदली ..! विकास कामे करण्यात सदैव पुढे असणाऱ्या पिंटूशेठ यांचे असे कमी वयात जाणे दुर्दैवी आहे.. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.. जो आवडतो सर्वांना , तोची आवडे देवाला असे म्हणतात.. पिंटूशेठ अनेक रंजल्या गांजल्या लोकांसाठी देवापेक्षा कमी नव्हते.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..! भावपूर्ण श्रद्धांजली

                शब्दांकन:
                मनोज देवकर
                सामाजिक कार्यकर्ते, वेजेगाव

.............................................................
आदर्श गलाई बांधव हरपला
आनंदराव शेठ देवकर यांनी संपूर्ण आयुष्य राजा माणसासारखे जगले. दारात आलेल्या कोणालाही त्यांनी रिकाम्या हाताने कधी पाठवले नाही. खरसुंडीच्या श्रीनाथांचे भक्त असलेल्या आनंदराव शेठ यांनी गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक रविवारी खरसुंडीच्या मंदिरात महाप्रसादाची अखंड परंपरा सुरू केली आहे. समाजाने एक आदर्श गलाई बांधव आज गमावला आहे.
                   पंढरीनाथशेठ देवकर,
                   गलाई बांधव, आंध्रप्रदेश. 

..........................................................
 समाजाचे न भरुन निघणारे नुकसान 
           आनंदराव शेठ देवकर यांच्या निधनामुळे गलाई बांधवांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. आज तालुका एका कर्तत्वान युवा उद्योजक, दानशूर आणि अजातशत्रू व्यक्तीमत्वाला हरपला आहे. 
                    विजय देवकर,
                    गलाई बांधव, वेजेगाव

Post a Comment

0 Comments