Daily Mahasatta

Daily Mahasatta

कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज नवीन पूल पाण्याखाली


: नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन

मिरज ( किरण पाटील)
          कृष्णा, कोयना, वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज यांना जोडणारा नवीन पूल देखील पाण्याखाली गेला आहे.
          कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज मधील बंधारा यापूर्वीचा पाण्याखाली गेला आहे, यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पाणी सातत्याने वाढत असल्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. पाणी पातळी वाढली आहे तरी नदीकाठच्या भागातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 
          खबरदारी म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कसबे डिग्रज मौजे डिग्रज आपत्ती व्यवस्थापन समिती आणि प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments