Daily Mahasatta

Daily Mahasatta

आमदार गोपीचंद पडळकर बनले राज्याचे नेते


: भाजपच्या प्रवक्ते पदी निवड

सांगली, राजेंद्र काळे
            आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात चर्चेत राहणारे धनगर समाजाचे युवा नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपच्यावतीने प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचा राजकीय प्रवास खऱ्याखुऱ्या अर्थाने राज्याचे नेते या दृष्टीने सुरू झाला आहे असे म्हणावे लागेल.
           गेल्या पंधरा वर्षांपासून अधिक काळ गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागासह राज्यभरातील युवकांना आपल्या नेतृत्वाची भुरळ घातली आहे. कोणतेही पद नसताना त्यांना राज्याचे नेते आणि स्टार प्रचारक अशी विशेषणे कार्यकर्त्यांकडून जोडली जात होती. विधानसभा निवडणुकीतील तीन अपयशानंतर तसेच लोकसभा निवडणुकीतील चांगल्या लढतीनंतर देखील आलेल्या अपयशानंतर पडळकर यांचे पुढे काय होणार? हा प्रश्न कार्यकर्त्यांना होता.
           परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने गोपीचंद पडळकर यांचा अभ्यास, गुणवत्ता, निर्भिड वक्तृत्व आणि युवावर्गावर असलेली छाप पाहून पडळकर यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची संधी दिली. आमदार पडळकर पक्षाची भूमिका राज्यस्तरावर प्रभावीपणे मांडू शकतात असा ठाम विश्वास असल्यानेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता खर्या अर्थाने आमदार पडळकर यांचा राज्यस्तरावरील राजकारणात प्रवेश झाला आहे.


Post a Comment

0 Comments