Daily Mahasatta

Daily Mahasatta

ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण

ब्रह्मनाळ : बोट दुर्घटनेच्या ठिकाणी वृक्षारोपण करताना माया गडदे, लता गायकवाड, संदिप राजोबा, प्रशांत बंडगर, अशोक पाटील, आनंदा कारंडे आदी.

पलूस (मोसीन वांगकर)
            गतवर्षी आलेल्या महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन उद्ध्वस्त झाले होते. याच महापुरात ब्रह्मनाळ ता.पलूस येथे आठ ऑगस्ट रोजी कृष्णेच्या महापुरात बोट पलटी होऊन १७ लोकांना प्राण गमवावा लागला होता. या ठिकाणी जनक्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महापुरामुळे बळी गेलेल्या लोकांच्या आठवणी चिरंतन राहव्यात यासाठी वृक्षारोपण करण्यात आले.
         कृष्णेच्या महापुरातून गावाबाहेर पडत असताना निष्पाप १७ लोकांना जलसमाधी मिळाली होती.त्या लोकांच्या स्मृती सदैव गावातील लोकांच्या मनात राहाव्यात. या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या ठिकाणी असणाऱ्या जमिनीचे मालक वसंत पाटील यांनी गावातील महिलांनी मांडलेल्या प्रस्तावास मान्यता दिली. बोट दुर्घटनेत मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाइकांकडून आंब्याच्या वृक्षाची लागवड केली. वृक्षारोपण आनंदराव कारंडे, सिद्धू वडेर, शिवाजीराव गडदे यांच्या हस्ते करण्यात आले.                   यावेळी जनक्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा माया गडदे, लता गायकवाड, सुरेखा लोटे माणिक लोटे, दिपाली जगदाळे, उज्वला येळावकर आदी महिला कार्यकर्त्यांसह स्वाभिमानीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, अशोक पाटील, प्रशांत बंडगर, वसंत पाटील, हेमंत जगदाळे, कृष्णा विसापूरकर, दिलीप चौगुले व गावातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments