Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर


: १०० बेडचे केबिन उभारणी अंतिम टप्प्यात
: ऑक्सिजन पाईपलाईनचे काम उद्यापासून सुरू
: आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली पाहणी

सांगली, प्रतिनिधी
          महापालिकेच्यावतीने आदीसागर हॉलमध्ये सुरू होणाऱ्या कोविड हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज येथे १०० बेडचे केबिन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून उद्यापासून ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरू होणार आहे. याचबरोबर रुग्णांसाठी शुद्ध पाण्याची सोय केली जाणार आहे. या कामाची मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाहणी करीत आवश्यक सूचना केल्या.
              कोल्हापूर रोडवरील आदीसागर मंगल कार्यालयात १०० बेडचे कोविड हॉस्पिटल महापालिका उभारत आहे. यामध्ये दुमजली हॉलमध्ये प्रत्येकी ५० रुग्णांची आणि कोविड संशयित रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात येत आहे. या साठी बेड केबिन उभारणीचे काम गतीने सुरू आहे. याचबरोबर शनिवार पासून ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे कामही सुरू होत आहे. या कोविड रुग्णालयातील रुग्णांना शुद्ध आरवोचे पाणी दिले जाणार असून त्याचेही काम सुरू आहे.
              याचंबरोबर रुग्णालयासाठी काम करणाऱ्या डॉक्टर आणि इतर स्टाफसाठी राहण्याची आणि विश्रामसाठी शेजारीच जुन्या कार्यालयात सोय करण्यात येत आहे. महापालिकेकडून हे १०० बेडचे कोविड हॉस्पिटल उभारणीचे काम गतीने सुरू असून या कामाची पाहणी आयुक्त नितीन कापडणीस यांनी करत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, शहर अभियंता आप्पा अलकुडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सतीश सावंत, वैभव वाघमारे, अविनाश पाटणकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments