Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा, आटपाडी येथील कोव्हीड सेंटरना आधुनिक वैद्यकीय उपकरणे द्यावीत

 : माजी आमदार अॅड सदाशिव पाटील यांचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

सांगली ( राजेंद्र काळे)
        सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी खानापूर, आटपाडी तालुक्यासह विटा शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी खानापूर, आटपाडी तालुक्यातील कोव्हीड सेंटरला सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सामुग्री द्यावी, असे साकडे माजी आमदार अॅड सदाशिव पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे घातले आहे.
          याबाबत पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे, मार्च महिन्यापासून कोरोनाने राज्य आणि देशभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र गेल्या चार महिन्यात कोरोनाची झळ विशेष करून ग्रामीण भागाला बसली नव्हती. परंतु गेल्या तीन आठवड्यापासून खानापूर तालुका, आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रंस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने विटा शहर आणि आटपाडी येथे कोव्हीड सेंटर उभा करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचाराची तसेच संपर्कात आलेल्या लोकांच्या विलगीकरणाची सोय केली आहे. मात्र या बेडची संख्या सद्या अपुरी पडत आहे.
        आगामी काही दिवसात यापेक्षा विदारक अवस्था येऊ शकते. त्यामुळे विटा आणि आटपाडी येथील कोव्हीड सेंटर मधील बेडसची संख्या वाढवावी, व्हेंटिलेटर, सुसज्ज रुग्णवाहिका यासह अन्य सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची एक प्रत पालकमंत्री जयंत पाटील यांना देखील पाठविण्यात आली आहे अशी माहिती अॅड. पाटील यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments