Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात आज १६३ कोरोना पाॅझिटीव्ह

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे )
         वाळवा तालुक्यात आज १६३ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ती १०६५ वर पोहचली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये इस्लामपूर शहरातील ७० जणांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी दिली.
       तालुक्यातील कोरोना रुग्णांची  संख्या हजारच्या पार झाल्याने तालुक्याबरोबर इस्लामपूर शहरात घबराटीचे वातावरण आहे. आज पुन्हा नव्याने १६३ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये ११८ पुरुष व ४५ महिलांचा समावेश आहे. आज तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण सापडलेत त्यांची संख्या पुढील प्रमाणे:इस्लामपूर ७०, तुजारपूर २, चिकूर्डे ३, गोटखिंडी २, पेठ ७, कुरळप ४, ताकारी १, साटपेवाडी १, बागणी ६, वाळवा २, आष्टा ३, वाटेगाव १, रेठरेधरण ६, इटकरे १, चिकूर्डे १, शिगाव ५, तांदुळवाडी ७, आमणापूर १, बोरगाव ३, येडेनिपाणी १, काकाचीवाडी १, जुनेखेड १, मसुचिवाडी १, शिरटे ३, दुधारी ३, येडेमच्छिद्र ३, किल्लेमच्चीन्द्र ३, कापुसखेड १, नेर्ले ३, तांदुळवाडी ६, लाडेगाव १, मर्दवाडी १, नरसिंहपूर ३, कामेरी १, बावची १, हुबालवाडी २, ऐतवडे बु.१ याप्रमाणे आहे.


 

Post a Comment

0 Comments