चिंचणी हनुमान सोसायटीच्या अध्यक्षपदी विश्वास महाडीक


: उपाध्यक्षपदी शशिकांत माने यांची निवड
चिंचणी ( कुलदीप औताडे)
         चिंचणी ता. कडेगाव येथील हनुमान
सोसायटीच्या अध्यक्षपदी विश्वास पोपट महाडीक (पिटू आबा) यांची तर उपाध्यक्षपदी शशिकांत पांडुरंग माने यांची निवड झाली. आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश रामुगडे यांनी कामकाज पाहिले .
          यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष विश्वास महाडीक म्हणाले, चिंचणीच्या हनुमान सोसायटीला गौरवशाली इतिहास आहे. सर्व सभासद व शेतकरी यांना केंद्रबिंदू मानत संस्थेची वाटचाल अशीच सुरू राहील. नेत्यांनी जो विश्वास आपल्यावर टाकला आहे. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
         यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सभासदांच्यावतीने सत्कार करण्यात आला .कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम ,सागरेश्वर सुतगीरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी अध्यक्ष रमजान मुल्ला यांचेसह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते .

Post a comment

0 Comments