Daily Mahasatta

Daily Mahasatta

पोलीस हवालदार नाना पाटील यांचा ह्रदयविकाराने मृत्यू

 
विटा, प्रतिनिधी
        येथील विटा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार नानासो आण्‍णासो पाटिल (वय 50 रा. ढालगाव, ता.कवठेमंकाळ) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विट्यातून ते ढालगाव या मुळ गावी परत निघाले होते.
         नाना पाटील यांनी 1996 साली विटा पोलीस स्टेशनमधून पोलीस कर्मचारी म्हणून आपल्या सेवेची सुरुवात केली. विटा शहरातील खमक्या ट्राफिक पोलीस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. विट्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं होतं गेल्या 24 वर्षाच्या नोकरीमध्ये विटा, आटपाडी, कडेगाव, तासगाव अशा त्यांच्या बदल्या होत. तरीही विटा हेच त्यांचे मुख्यालय राहिले. त्यामुळे 24 वर्षातील सुमारे 15 ते 17 वर्षे त्यांनी विटा शहरातच नोकरी केली.
          वर्षभरापूर्वी त्यांची तासगावला बदली झाली होती तिथून आठ दिवसांपूर्वी त्यांची पुन्हा एकदा विटा पोलीस स्टेशनला बदली झाली. परंतू कर्तव्यावर हजर होण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता विटा शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज विटा येथून उपचार घेऊन ते घरी परत जात असताना रस्त्यातच त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. हावलदार नाना पाटील यांचे राजकीय क्षेत्रातील मातब्बर नेते मंडळींसह सामान्य लोकांपर्यंत सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments