Daily Mahasatta

Daily Mahasatta

अंबकच्या संग्राम शिंदेचे ' यूपीएससी ' परिक्षेत यश: जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या संग्रामचे देशपातळीवर नेत्रदीपक यश
कडेगाव (सचिन मोहिते)
    अंबक ता. कडेगाव येथील संग्राम सतीश शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७८५  व्या क्रमांकाने यश मिळवला आहे. मंगळवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
    शालेय जीवनापासूनच हुशार व कुशाग्र बुद्धामत्ता लाभलेल्या संग्राम यांनी   देशपातळीवर हे यश मिळविल्याबद्दल  आई, वडील व कुटुंबियांनी त्यांना पेढा भरवत अभिनंदन केले. संग्राम याने अंबक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले .अंबक येथील श्रीपतराव कदम प्रशालेत पाचवीला प्रवेश घेऊन नवोदयची तयारी केली. पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयातून माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण पूर्ण केले. 
    कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात बीएस्सी ऍग्री केले . शालेय जीवनापासूनच त्याची  स्पर्धा परीक्षेतून यश मिळविण्याची जिद्द होती. ती त्याने अथक परिश्रम घेत पूर्ण केली.दुसऱ्याच  प्रयत्नात संग्रामने हे यश मिळविले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  कडेगाव शाखेत शाखा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले सतीश शिंदे  यांचा संग्राम हा मुलगा आहे.अंबक व परिसरातील ग्रामस्थांनी संग्रामचे अभिनंदन केले .Post a Comment

0 Comments