Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या लोकांना धोक्याचा इशारा


: नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
कराड , ( संतोष शिंदे)
          महाराष्ट्राचे वरदायिनी असलेल्या कोयना धरणाचे आज सकाळी 11 वाजता 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 क्युसेक्स व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्युसेक्स असा एकूण 10410 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियंत्रण कक्षाने कळविले आहे.
           सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे 90 टक्के भरलेली आहेत. तसेच हवामान खात्याने पुढील 2 दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रमुख धरणातून कोयना उरमोडी तारळी कनेर वीर यामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आणि तो वाढण्याची शक्यता असलेने नागरिकांनी पुढील सूचनांचे पालन करावे.  नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू नये अथवा पोहण्यासाठी जाऊ नये,  पुलावरून /ओढ्यावरून पाणी वाहत असेल तर पूल ओलांडू नये, घाटातून प्रवास टाळावा व दरड प्रवण क्षेत्रात जाऊ नये, सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे, जनावरांना नदी नाल्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे, असे आवाहनही जिल्हा नियंत्रण कक्षाकडून जनतेस करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments