Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली सिव्हील मध्ये नवीन ४७ आयसीयु बेड


: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नांना यश
: सांगलीत विविध संघटना, कार्यालयात २०० ऑक्सीमिटरचे वाटप करणार


सांगली, (राजेंद्र काळे)
          सांगलीच्या वसंतदादा पाटील सर्वोपचार रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांसाठी ४७ आयसीयु बेड तातडीने कार्यान्वयीत करण्यात आले आहेत. त्याचा लाभ रूग्णांना होत आहे. सरकारी रूग्णालयामध्ये आयसीयु बेडची संख्या कमी आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होते. त्याकरीता ५० आयसीयु बेडची संख्या वाढवावी अशी मागणी आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री वैद्यकिय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी लगेचच ही आयसीयु बेडची व्यवस्था सरकारी रूग्णालयामध्ये केलेली आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.
         पाटील म्हणाले, नवीन मंजूर बेड पैकी १८ बेडस् तर लगेचच कार्यान्वीत झाले आहेत.उर्वरीत बेडही कार्यान्वीत होत आहेत. या कामी सांगलीचे जिल्हाधिकारी यांचे खूप मोठे सहकार्य मोलाचे सहकार्य लाभले. सांगलीत मलेरिया, डेंगू, चिकणगुणिया व कोरोना याचा संसर्ग वाढत चाललेला आहे. त्याकरीता या ठिकाणी स्वतंत्र आयसोलेशन विभाग सुरू करावा अशी मागणी आपण केली होती. त्याचा प्रस्तावही सादर केला आहे. त्याची मंजूरी मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.
           सरकारी रूग्णालयाच्या इमारत देखभाल दुरूस्तीसाठी व नवीन बांधकामे उदा. ओपीडी, रक्तपेढी साठी निधी उपलब्ध होण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागात प्रस्ताव पाठविलेला आहे. ते मंजूरीचे आदेश वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांनी केले आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण लक्षात घेऊन रूग्णांना सुसह्य उपचार व तातडीने बेड मिळणे तसेच स्थानिक पातळीवर निर्णय होण्यासाठी राज्य शासनामार्फत आरोग्य निरीक्षकांची टीम पाठविण्याची विनंती आपण दोन्ही आरोग्य मंत्र्यांना केली आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहेण् बाहेरून येर्णाया रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त आहे. यामध्ये वृध्द व बहुविध आजार असणारे यांचा समावेश असला तरी अनेक तरूणांनाही जीव गमवावा लागलेला आहे. तरूण महिलांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. यासाठी रूग्णांच्या मृत्यूंचे ऑडिट होऊन त्याचा अहवाल समोर आला पाहिजे जेणेकरून त्यावर तोडगा काढता येईल.
जिल्ह्यातील अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये रूग्णांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क घेतल्याच्या तक्रारी आहेत. महात्मा फुले योजनेतील काही त्रुटींमुळे अवघ्या दहा ते पंधरा टक्के रूग्णांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे
त्यासाठी तातडीने मंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
            सलग चार महिने असलेल्या लॉकडाऊनमुळे नाभिक, रिक्षावाले, धोबी, फेरीवाले, दुकानदार आदि छोट्या व्यावसायिकांचे व दुकानदारांचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशीही मागणी आपण मदत व पुर्नवसन मंत्री मा. ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने सांगलीतील सलून असोसिएशन, हमाल पंचायत, वृत्तपत्र विक्रेते, सर्व दैनिक कार्यालये, बार असोसिएशन, भाजीपाला संघटना, व्यापारी संघटना आदींसाठी 200 ऑक्सीमीटर आम्ही वितरित करणार आहोत.
........................................................

Post a Comment

0 Comments