Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड येथील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त


: गणेशोत्सवापूर्वी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

कुपवाड (प्रमोद अथणीकर) 
          कुपवाड शहरातील मध्ये गल्लोगल्ली मध्ये कुत्र्यांच्या झुंडी मोकाट फिरत असल्यामुळे कुपवाडकर नागरिक त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर या भटक्या कुत्रांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
         कुपवाड मधील गल्लीबोळातून कमीत कमी वीस ते पंचवीस कुत्र्यांच्या झुंडी दिसून येत आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गेले कित्येक दिवस येथे मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने डॉग व्हॅन कशासाठी ठेवण्यात आल्या आहेत ? असे या भागातील नागरिकांच्यातून विचारले जात आहे.
काही दिवसापूर्वी या मोकाट कुत्र्यांनी अनेक लहान मुलांचे व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच त्या भागातील नागरिकांचे लचके तोडले होते. तरीही महापालिकेला जाग आली नाही. या कुत्र्यांनी एकाद्या निष्पाप चा जीव गेल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का ? असेही या भागातील नागरिकांच्यातून विचारले जात आहे .
          ठिक ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्यात आली आहे. पण मोकाट कुत्र्यांनी त्यातील कचरा विस्कटून रस्त्यावर आणत आहेत. रस्त्याने येणार जाणार्या नागरिकांच्या अंगावर ही कुत्री धाऊन जात आहेत. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे. आठवडाभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. अशावेळी रस्त्यावर नागरिक आणि विशेष करून महिला आणि मुलांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments