कुपवाड येथे ' कोव्हीड योद्धाचा ' मृत्यू


कुपवाड (प्रमोद अथणीकर)
       कुपवाड येथील औधोगिक वसाहती मधील 34 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे  मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे  कुपवाड परिसरात खळबळ उडाली आहे
     महाराष्ट्रात कोरोना विषाणूशी लढताना अनेक पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. आज कुपवाड औधोगिक वसाहती मधील  पोलीस कर्मचारी कोरोनाशी लढताना बळी गेला आहे. हा  34 वर्षीय पोलीस कर्मचारी गेल्या दोन वर्षापासून कुपवाड औद्योगिक वसाहती मधील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याला चार दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी त्याचा स्वॅब टेस्ट साठी घेतला असता त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता.
     त्याच्या वरती उपचार चालू असतानाच आज त्याचा मृत्यू  झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात शोककळा पसरली असून त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली कोव्हीड टेस्ट करून घ्यावी, असे आव्हान करण्यात आले आहे.

 

Post a comment

0 Comments