Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मधील नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह


  कुपवाड, प्रतिनिधी
           कुपवाड शहरातील धडाडीचे नगरसेवक गजानन मगदुम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे
     कुपवाडचे अपक्ष नगरसेवक व भाजपचे सहयोगी सदस्य मा.गजानन मगदूम गेले कित्येक दिवसापासून लोकांची सेवा करत आहेत. त्यांच्याकडे अनेक नागरिक भेटीस किंवा काही तरी कामासाठी येत असतात. त्यांची आज डॉक्टराच्या सल्ल्याने कोरोना ऄन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्यांचा कोरोना  रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नसुन सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचे राहते घरी डॉक्टराच्या सल्ल्याने होम आयसोलेशन केले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन नगरसेवक मगदूम यांनी केले आहे.
 

Post a Comment

0 Comments