कुपवाड मध्ये भाजी विक्रेत्यावर चौघांचा जीवघेणा हल्ला


कुपवाड ( प्रमोद अथणीकर )
         कुपवाड परिसरामध्ये एका भाजीपाला विक्रेत्याला मागील भांडणाचा राग मनात धरून चाकू व लाथाबुक्याने मारहाण करत जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघा युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड परिसरामध्ये भाजी विक्री करणारा योगेश आप्पा बाबानगरे (वय वर्षे 24 रा लवली सर्कल, संजय नगर सांगली) या युवकांवर काल रात्री दहाच्या सुमारास चार युवकांनी मागील भांडणाचा राग मनात धरून त्याच्यावर चाकू, लाथाबुक्याने हल्ला करत जखमी केले आहे.
या प्रकरणी जखमी योगेश बाबानगरे यांनी स्वतः फिर्याद दिली असून आरोपी विनायक पाटील, सुरज काळे, अमन शेख व (टोपण नाव जाकी वय वर्षे व पूर्ण पत्ता माहिती नाही) या चार युवकांनी कुपवाड हायस्कुलच्या शाळेच्या समोरील गल्लीत त्यास चाकू व लाथा बुक्याने मारहाण करून जखमी केले. जखमीवर शासकीय हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले असून आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल गव्हाणे करीत आहेत.

Post a comment

0 Comments