Daily Mahasatta

Daily Mahasatta

नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

कुपवाड (प्रमोद अथणीकर)
        सुरज फाऊंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत 74 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव एन. जी. कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 
         मा. एन. जी कामत यांच्या मनोगतामध्ये नवीन शैक्षणिक पद्धत कशी अवलंबून चांगले शिक्षण देता येईल, याची माहिती दिली. तसेच करोनावर कशी मात करायची याबद्दल माहिती सांगितली. सध्या सुरु असलेल्या ऑनलाइन क्लास व शिक्षकांच्या बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नव कृष्णा व्हॅली स्कूलचे उपप्राचार्य प्रशांत चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्या संगीता पागनीस नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मध्यमचे प्राचार्य मा. अधिकराव पवार , श्रीशैल मोटगी, राजेंद्र पाचोरे सुरज फाऊंडेशनचे मा. कुंतूनाथ खोत, सुरज स्पोर्टसचे विनायक जोशी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments