कुपवाड मधील नगरसेवकाच्या पुतण्यास कोरोना


कुपवाड (प्रमोद अथणीकर)
         कुपवाड भागात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. काल रविवार ता. 16 रोजी कुपवाड मधील एका नगरसेवकाच्या 34 वर्षीय पुतण्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
       कुपवाड मधील नगरसेवकांच्या पुतण्याची चार दिवसा पूर्वी स्वॅब टेस्ट साठी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल दिनांक 16 आगस्ट 2020 रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटूंबातील अन्य व्यक्तींचे स्वॅब टेस्ट साठी घेण्यात आल्या आहेत. संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांनी कोरोनाच्या संकटकाळात कुपवाड मधील लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. लोकांच्या उपचारासाठी आणि मदतकार्यासाठी झटणार्या या नगरसेवकांच्या घरात आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.

Post a comment

0 Comments