देवराष्ट्रेत भीषण अपघात, खानापूर तालुक्यातील दोघे ठारकार- दुचाकी अपघात :  दोघांचा मृत्यु झाला
      कडेगाव ( सचिन मोहिते)
         देवराष्ट्रे हद्दीत धनगर तळ्याजवळील रस्त्यावर  स्वीप्ट कार आणि दुचाकी वाहनांच्या भीषण अपघातात  खानापूर तालुक्यातील पोसेवाडी गावचे दोघे जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये अशोक शंकर जाधव (वय ४२ वर्ष) व विजय उर्फ बंटि विठ्ठल जाधव (वय ३८ ) हे दोघेही जागीच ठार झाले आहेत.
       याबाबत अधिक माहिती अशी  पोसेवाडी येथील अशोक जाधव आणि विजय जाधव हे दोघेजण पल्सर गाडी. नं MH . 10 . CH .5110 वरून  वांगीहुन देवराष्ट्रे कडे जात होते. त्यांचे समोरून म्हणजेच देवराष्ट्रे कडुन येणाऱ्या स्वीफ्ट गाडी नं MH .46. D .1107 चा चालक मोहन राजाराम कदम रहाणार शेळकबाव तालुका कडेगाव याने भरधाव वेगाने येऊन पल्सर गाडीला जोरदार धडक दिली . धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोघेही जागीच मृत पावले .सदर घटनेची फिर्याद दिपक सुखदेव जाधव राहाणार विटा यांनी दिलेली आहे.पुढील तपास चिंचणी वांगीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष गोसावी करत आहेत .


Post a comment

0 Comments