Daily Mahasatta

Daily Mahasatta

देवराष्ट्रेत कृषीकन्या श्वेता आलेकर हिचे ग्रामीण कृषी कार्यानूभव अंतर्गत वृक्षारोपण

चिंचणी ( कुलदीप औताडे)
           फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे बी.एस्सी हाॅर्टिकल्चरच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेली कु.श्वेता आलेकर हिने ग्रामीण कृषी कार्यानूभव उपक्रमांतर्गत देवराष्ट्रे ता. कडेगांव जि.सांगली येथे वृक्षारोपण करून वृक्षारोपणाची माहिती व महत्व ग्रामस्थांना पटवून दिले.
           श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निंबालकर , कार्यक्रम अधिकारी अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखली कृषीकन्या श्वेता आलेकर हिने देवराष्ट्रे येथे आवळा, बेल व विविध औषध उपयोगी वृक्षांचे रोपण केले.
          वृक्षारोपणानंतर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना संबोधन करताना कृषीकन्या म्हणाली, वृक्ष हे माणसाचे मित्र आहेत, माणसांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. हा ऑक्सिजन पुरवण्याचे काम वृक्ष करत असतात. परंतु सद्या सिमेंटच्या जंगलासाठी वृक्षांची जंगले तोडली जात आहेत हे अत्यंत दुर्दंवी असून असेच होत राहीले तर भविष्यात माणसांना ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे. 
       ऑक्सिजन विकत घेऊन माणसांना जगावे लागेल हे माणसांना न परवडणारे आहे, याकरिताच माणसांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून प्रत्येकांने आपले कर्तव्य समजून एक झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे असे सांगून वृक्षांचे महत्व पटवून दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद महिंद, मनोज मदने व ग्रामस्थ उपस्थित होते.

      

Post a Comment

1 Comments