चिंचणी ( कुलदीप औताडे )
आसद (ता. कडेगाव ) येथील ५२ वर्षीय वर्षीय महिलेचा बुधवार दिनांक २९ जुलै रोजी मृत्यू झाला होता.याच महिलेच्या कुटुंबातील ५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आसदसह सोनहीरा खोऱ्यात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे .
आसद येथील मृत महिलेच्या कुटुंबातील ६ जणांसह गावातील अन्य एका व्यक्तीस कडेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहात संस्थात्मक विलगिकरण कक्षात दाखल केले होते . या सर्वांचा कोरोना चाचणी आहवाल प्राप्त झाला असून या महिलेच्या अनुक्रमे ३० वर्षे व २७ वर्षे वयाच्या मुलांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय मृत महिलेचे ७२ वर्षे वयाचे दिर व दिराची ६९ वर्षे वयाची पत्नीतसेच दिराची ५ वर्षे वयाची नात अशा ५ जणांचा कोरोना चाचणी आहवाल पॉझिटिव्ह आला आहे .
तर१४ वर्षे वयाच्या नातवाच्या व वाहन चालकाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे .दरम्यान शुक्रवार दिनांक ३१ जुलै रोजी आसद येथील कंटेन्मेंट झोन मधील एका ७५ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी आहवल पॉझिटिव्ह आला आहे.
0 Comments