Daily Mahasatta

Daily Mahasatta

विश्वासराव नाईक कारखाना परिसरात आता ' चाईल्ड हेल्थ पार्क '

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखाना परिसरातील उभारलेल्या चाईल्ड हेल्थ पार्कचे उदघाटन करताना आ. मानसिंगराव नाईक, बाबासाहेब पवार, विजयराव नलवडे, विराज नाईक, राम पाटील व अन्य. 

चिखली ( आनंद मलगुंडे)
         : चाईल्ड हेल्थ पार्कमुळे विश्वासराव नाईक कारखान्याच्या सौन्दर्यात भर पडली आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगभाऊ नाईक यांनी केले.
        चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखाना परिसरातील चाईल्ड हेल्थ पार्कचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी प्रांतपाल बाबासाहेब पवार प्रमुख उपस्थितीत होते.
          आमदार नाईक म्हणाले, मुळात विश्वासराव नाईक कारखान्यावर असलेल्या प्रचंड प्रमाणातील वनराईमुळे परिसरात प्रसन्नता आहे. हवा स्वच्छ आहे. गणेश मंदिरामुळे कायम वातावरण भक्तिमय असते. त्यामुळे वर्षाकाठी हजारो लोक भेट देतात. अनेक शाळांच्या सहली येतात. वनराईमुळे कारखाण्यास पर्यावरणाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सर्वांमागे लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक व तत्कालीन कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार यांची दूरदृष्टी आहे. आता कारखाना व उद्योजक व प्रेमचंद बाफना यांच्या सौजन्याने लायन्स क्लब चिखली मार्फत चाईल्ड हेल्थ पार्क उभारण्यात आला आहे. पार्कच्या निर्मितीमुळे मुलांचे मनोरंजन होईल व आरोग्यही चांगले राहील.
          आमदार नाईक यांच्या हस्ते पार्कचे फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलावडे, युवा नेते विराज नाईक, कार्यकारी संचालक राम पाटील, ए. एन. पाटील, अशोक कुरणे, राहुल पवार, सचिन पाटील, विठ्ठल चव्हाण, राजेंद्र पाटील, विजय देसाई, दिनकर महिंद, रवींद्र पाटील, सर्जेराव देसाई, एम. आर. पाटील आदी उपस्थित होते.
…..……………………………

Post a Comment

0 Comments