Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीच्या काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील कोरोना पाॅझीटीव्ह


सांगली, प्रतिनिधी 
         सांगली महापालिका क्षेत्रातील काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जयश्रीताई यांच्या संपर्कातील लोकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन सोशल मीडियातून करण्यात आले आहे.
          काँग्रेस नेत्या जयश्री ताई पाटील यांचे जावई जितेश कदम आणि आमदार मोहनराव कदम यांच्यासह कदम कुटुंबातील सात जणांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता जितेश कदम यांच्या सासुबाई जयश्रीताई पाटील यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यात माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, जितेश कदम यांच्या नंतर आता जयश्रीताई पाटील अशा दिग्गज राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Post a comment

0 Comments