Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यातील १८ जण कोरोना पाॅझीटीव्ह


इस्लामपूर,  ( सूर्यकांत शिंदे )
: वाळवा तालुक्यात आज १८ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.
तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत निघाली असून प्रशासनाची चिंताही वाढली आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या १४३ वर पोहोचली आहे. येथील बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात रुग्णांची व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान काल येथील वाळवा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कोरोनाबाधित झाल्याने दक्षतेचा भाग म्हणून पंचायत समितीची पूर्ण इमारत सॅनिटाईझ करण्यात आली आहे.
वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे ४५ व १९ वर्षीय २ महिला तर १४ वर्षाचा युवक पॉझिटिव्ह आला आहे. भवानीनगर येथे ७० वर्षीय महिला व ४२ वर्षे वयाचा पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. ताकारी येथे आज चार जण पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये चार वर्षाची लहान मुलगी व ८ वर्षे वयाचा मुलगा यांच्यासह ३८ वर्षाची महिला आणि १५ वर्षाच्या युवकाचा समावेश आहे. आष्टा येथे ६२ वर्षे वयाचा पुरुष, कासेगाव येथे ७५ वर्षे वयाची वृद्ध महिला तर ४५ व ७८ वर्षे वयाचा पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. ढवळी येथे ४५ वर्षे वयाचा पुरुष, भडकंबे येथे ५ वर्षे वयाचे बाळ, काळमवाडी येथे ३५ वयाचा पुरुष व ३० वर्षे वयाची महिला तर मसुचिवाडी येथे ४० वर्षे वयाची महिला या सर्वांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व रुग्णांच्या राहत्या घरांच्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करून आरोग्य तपासणीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
भवानीनगरमध्ये भीतीचे वातावरण
       वाळवा तालुक्यातील भवानीनगर व रेठरेहरणाक्ष येथे खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे या दोन्ही गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरशी संबंधित त्याच्याकडून उपचार घेतलेल्या १४० जण व कुटुंबातील ९ जणांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे.

Post a Comment

0 Comments