Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा, तीन आमदार पॉझिटीव्ह



सांगली (राजेंद्र काळे)
         सांगली जिल्ह्याला कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून आता राजकीय क्षेत्रातील अनेक  मातब्बरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  मिरजचे आमदार सुरेश खाडे आमदार, आमदार  मोहनराव कदम यांच्या नंतर भाजपचे सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
          सांगली  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून आता दिवसाला सरासरी 300 हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. यामध्ये आता राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना देखील कोरोना
ची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या कुटुंबाला कोरोना चा मोठा दणका बसला असून यामध्ये आमदार मोहनराव कदम त्यांचे पुत्र हणमंतराव आणि शांताराम तसेच नातू जितेश कदम यांच्यासह सात जणांना कोरोना  झाला आहे. मिरजेचे भाजपचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा देखील कोरणा चाचणी अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला .
        त्याचप्रमाणे आज सांगली मतदार संघाचे आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी या दोघांचा कोरोना चाचणी  अहवाल पॉझिटिव आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील विद्यमान तीन आमदारांना कोरोना ची बाधा झाल्याचे  स्पष्ट झाले. त्याच प्रमाणे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, सांगलीचे माजी आमदार संभाजी आप्पा पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, सांगली महापालिकेच्या नेत्या सांगली महापालिकेच्या नेत्या आणि माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्री ताई पाटील यांचा देखील अहवाल काही दिवसापूर्वी पॉझिटिव आला आहे.
        सांगली जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात देखील आता चिंतेचे सावट पसरू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनावश्यक  उद्घाटन, मेळावे, वाढदिवस यासारखे कार्यक्रम टाळता येणारे कार्यक्रम आवर्जून टाळणे गरजेचे झाले आहे
तसेच नागरिकांनी देखील कोरोना पासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Post a Comment

0 Comments