Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्याला कोरोनाचा मोठा धक्का, एकाच दिवशी ७५ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह

इस्लामपूर (हैबतराव पाटील)
         वाळवा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून इस्लामपूर मध्ये 18 तर संपूर्ण वाळवा तालुक्यात आज 75 कोरोना रुग्ण पाॅझिटीव्ह आल्याने चिंता वाढू लागली आहे. वाळवा तालुक्यातील छोट्या छोट्या वाडी वस्तीवर कोरोना आपले अस्तित्व दाखवू लागल्याने ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण आहे.
         वाळवा तालुक्यात कोरोना गतीने पसरतोय असे सध्या चित्र आहे. नागरिकांनी अतिशय दक्षता घेण्याची गरज आहे. आज तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्ण सापडलेत त्यांची संख्या पुढील प्रमाणे: 7, कासेगाव 7, पेठ 1, वाघवाडी 3, वाळवा 6, चिकुर्डे 1, आष्टा 2, बोरगाव 2, दुधारी 1, मसुचिवाडी 5, ताकारी 1, इस्लामपूर 18, कापुसखेड 1, मालेवाडी ,1तांदुळवाडी 11, इटकरे 5, कामेरी 1, येडेनिपणी, शिगाव 1, शिरटे 1, करंजवडे 1, कुरळप 1, अशी रुग्णांची संख्या असून यातील काही रुग्ण इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथे व मिरज येथे काही रुग्ण उपचार घेताना दिसत आहेत.तर इस्लामपूर येथील प्रशासनाने जाहीर केलेला लॉक डाऊन चा आज तिसरा व अंतिम दिवस आहे नागरिकांनी बंद ठेऊन उत्तम प्रतिसाद दिला आहे. सर्व व्यवहार बंद होते .

Post a Comment

0 Comments