Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून कु. साक्षीला कौतुकाची थाप


: साक्षी महाडिक ९८ टक्के गुणासह देवराष्ट्रे केंद्रात प्रथम

कडेगाव  (सचिन मोहिते)
: चिंचणीच्या श्री शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी कु. साक्षी प्रताप महाडिक हिने ९८ टक्के गुणासह देवराष्ट्रे केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल कृषी राज्य मंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांनी आज कु. साक्षी हिची भेट घेऊन तिचे कौतुक केले.
        कु. साक्षी ही पत्रकार प्रताप महाडिक यांची कन्या आहे. सााक्षीने मिळवलेल्या नेत्रदीपक यशामुळे तिचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाच्या या भीषण संकटात मंत्री विश्वजीत कदम हे अहोरात्र लोकांना आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या धावपळीतून देखील वेळ काढून त्यांनी कु. साक्षी महाडिक हिचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सागरेश्वर सुतगीरणीचे अध्यक्ष शांताराम कदम उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments