Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडच्या नव महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि अकुज ट्रस्ट मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


कुपवाड, (प्रमोद अथणीकर)
         नव महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड संस्थेच्या सौ. आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च, माध्यमिक विद्यालय, न्यू प्रायमरी स्कूल, अकुज प्रायमरी व प्रि प्रायमरी स्कूल, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, लाल बहादुर बालमंदीर कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला.
            संस्थेच्या संचालिका डॉ. पूनम उपाध्ये (चौगुले) यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी रघुनाथ सातपुते (अध्यक्ष, सांगली जिल्हा शिक्षकेतर संघटना,) शितोळे गुरुजी, (माजी मुख्यध्यापक), वसंत प्राथमिक शाळा, संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक –शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत अकुज ड्रिमलॅडच्या भव्य क्रिडागंणावर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून संपन्न झाला.
           कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक न्यू प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. डॉ. पूनम उपाध्ये (चौगुले) यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कोरोना काळात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मा. डॉ. पूनम उपाध्ये (चौगुले) यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल व सेवेबद्दल त्यांना “कोरोना योध्दा” म्हणून गौरविण्यात आले व त्यांच्या विशेष सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक व विभागप्रमुख शिरीष चिरमे, कुदंन जमदाडे, ज्योती पाटील, भाग्यश्री चंदुरे, चंदन शहा यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अनिल चौगुले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments