Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी शरद (भाऊ) लाड यांच्याकडून मोठी मदत


: चिंचणी ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय उपकरणांची भेट

चिंचणी ( कुलदीप औताडे )
       ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ऑक्सिजन, इ.सी.जी आणि इतर वैद्यकीय गोष्टींची तात्काळ सोय व्हावी, यासाठी सांगली जिल्हा परिषद सदस्य शरद (भाऊ) लाड यांनी चिंचणी आणि कडेगाव ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय उपकरणांची मदत केली. या उपकरणांमुळे कडेगाव तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या उपचारादरम्यान मोठी मदत होणार आहे.
        या उपकरणांमध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर तसेच ईसीजी मशीन आणि मॉनिटर या उपकरणांचा समावेश अाहे. यामधील ऑक्सिजन कॉन्संट्रेटर या उपकरणाद्वारे हवेतील ऑक्सिजन रुग्णास देऊ शकतो. त्यामुळे तात्काळ सेवेसाठी ऑक्सिजन सिलिंडरची कमी असेल तर या उपकरणाचा खूप उपयोग होऊ शकतो. या सर्व उपकरणांची किंमत सर्वसाधारण ३ लाख रुपये इतकी आहे. अशा वैद्यकीय उपकरणांची मदत करून शरदभाऊ लाड यांनी सामाजिक बांधिलकी जपली अाहे.
यावेळी सांगली जिल्हा परिषद सदस्य शरद (भाऊ) लाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मदने एम.एच , डॉ.वैशाली पाटील मोहिते वडगाव, फार्मासिस्ट विठ्ठल भोसले,अशोक महाडिक (काका) ,रमेश एडके, वैभव पवार ,शशिकांत पाटील,भरत गोतपागर,धर्यशील पाटील, सुरेश शिंगटे,राहुल जाधव तसेच चिंचणी गावचे ग्रामस्थ,युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments