Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळव्याच्या खासगी सावकाराला अटक


: दिव्यांग इस्त्री व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आष्टा, प्रतिनिधी
        व्याजाने दिलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावून शिवीगाळ आणि मारहाण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालेवाडी ता. वाळवा येथील राहुल मच्छिंद्रनाथ जाधव या खासगी सावकारा विरोधात आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी, सांगली गुन्हे अन्वेषण विभागाकडे एका व्यक्तीने निनावी अर्ज दाखल करून मालेवाडी ता. वाळवा येथील दिव्यांग व्यक्ती प्रदीप भानुदास मोरे वय ३५ रा. मालेवाडी या इस्त्री दुकान व हॉटेल चालवणार्या  व्यक्तीने १५ जुलै रोजी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तक्रार अर्जात म्हंटले होते. या तक्रारीची  दखल  घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी मयत व्यक्तीच्या नातेवाईकाकडे अधिक चौकशी केली.
      आत्महत्या केलेल्या प्रदीप मोरे या व्यक्तीचे  कोणाशी आर्थिक संबंध होते, याची पोलीस विभागाच्या वतीने चौकशी करण्यात आली. तसेच नातेवाईकांकडून घेण्यात आलेल्या जबाबातून आत्महत्या करण्यापूर्वी राहुल जाधव नामक सावकाराने दिलेल्या पैशातून त्रास देऊन प्रदीप मोरे यास आत्महत्या करण्यास भाग पडल्याचे तांत्रिक पुराव्यावरून स्पष्ट झाले होते. सावकार राहुल जाधव सावकर हा मयत प्रदीप मोरे यांची  इस्त्रीच्या दुकानातील बिले न देणे हॉटेलमधील पैसे न देणे तसेच वारंवार पैशाची मागणी करून मारहाण केल्याचे देखील स्पष्ट झाले होते.
         त्यानुसार खासगी सावकार राहुल मच्छिंद्रनाथ जाधव रा. मालेवाडी ता. वाळवा याच्याविरोधात बेकायदा सावकारी करून सावकारीचे पैशासाठी प्रदीप मोरे यास वेळोवेळी त्रास देऊन आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण अवताडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश कदम, कुबेर खोत, शंकर पाटील यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments