कुपवाड मध्ये दारू साठा जप्त


-पोलिसांनी केला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत 
कुपवाड( प्रतिनिधी )
   कुपवाड परिसरात मध्ये काल रात्री कुपवाड पोलिसांनी धाड टाकून देशी दारूच्या बाटल्या रोख रक्कम व चार चाकी गाडी असा एकूण 2 लाख 1 हजार 289 इतक्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे 
  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कुपवाड हनुमाननगर येथे  चार चाकी गाडीतून अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचे समजताच तात्काळ कुपवाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाड टाकून दारू विक्री करणारा रतन शिवाजी माने वय वर्ष 23 रा तराळ गल्ली कुपवाड यास पकडून त्याच्याकडील देशी दारूच्या 20 बाटल्या प्रति नग दर 52 रुपये किमतीचे रोख रक्कम 250 व चार चाकी गाडी असा एकूण एकूण 2 लाख 1 हजार 289 इतक्या किमतीचे मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास स पो कॉ पाटील करीत आहे.

Post a comment

0 Comments